पोलीस असल्याची बतावणी करून सॉफ्टवेअर इंजिनियरला लुबाडले

एमपीसी न्यूज – मित्रांसमवेत चहा पिऊन कंपनीत जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून सॉफ्टवेअर इंजिनियरला लुबाडले. ही घटना शनिवारी (दि.11) बावधन येथील हॉटेल अॅम्ब्रोसिया गेटजवळील सार्वजनिक रोडवर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

रोहिदास पोतंगले (वय-23, रा. कात्रज) असे लुबाडलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास हे एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतात. शनिवारी (दि.11) सायंकाळी ते मित्रांसमवेत चाहा पिऊन कंपनीत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याकडून तीन हजार रुपये बळजबरीने हिसकावून पळून गेले.

सहायक पोलीस निरीक्षक जी. धामणे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.