मतदारांच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही – अभिषेक बारणे

एमपीसी न्यूज – बारणे घराण्यातच राजकीय धडे मिळाले.  प्रभाग क्रमांक 23चा कायापालट करायचा एवढे मनांत ठेवून निवडणुकीत उतरलो. सिव्हिल इंजिनिअर जरी असलो तरी अर्धे काम राजकीय वातावरणातून  करतो. सगळयात लहान नगरसेवक म्हणून मतदारांनी मला निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही. अशा भावना नवनिर्वाचित नगरसेवक अभिषेक बारणे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या.

2012 मध्ये मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून निवडणूक लढविली. माझ्या विरोधात झामाबाई बारणे होत्या, माझा फक्त 400 मतांनी पराभव झाला. पण त्याचे वाईट न वाटून घेता मी कायम प्रभागातील नागरिकांसाठी काम करत राहिलो आणि त्या कामाचे चीज मतदारांनी मला दिले. आणि यावर्षी पूर्ण पॅनेल निवडून आणला.  प्रभागातील लागणा-या मूलभूत सुविधांना प्रथम प्राधान्य देणार आहे.

   

मी जरी बांधकाम व्यावसायिक असलो तरी प्राधान्य अगोदर मतदारांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावठाणाच्या विकासाला गती मिळणार आहे.विकासकामे करीत असताना येणा-या अडचणींना तोंड देणार. त्यातून मार्ग काढून मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला खरे उतरण्याचा मनांपासून प्रयत्न करणार आहे, जनतेच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांच्या परिपूर्तीसाठी अधिकाराचा व संधीचा वापर नक्कीच करुन चांगले नागरी जीवन सामान्य नागरिकाच्या  वाट्याला कसे येईल यासाठी काम करणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.