वेस्ट टू एनर्जीसाठी लवकर निविदा काढा; महापौर काळजे यांच्या अधिका-यांना सूचना

महापौरांची मोशी कचरा डेपोला भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांनी महापालिकेचे काम हाती घेतले असून त्यांनी आज (सोमवारी) मोशीच्या कचरा डेपोला भेट दिली. यावेळी त्यांनी निविदे अभावी अडकलेल्या वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाच्या  कामांच्या निविदा लवकरात-लवकर काढण्यात याव्यात अशा सूचना अधिका-यांना दिल्याची माहिती, काळजे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना दिली.

यावेळी कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, उपअभियंता मनोहर जावराणी आदी उपस्थित होते. यावेळी महापौरांनी आज  घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी चालू व नियोजित प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी महापौरांनी गांडूळ खत प्रकल्प, कच-यापासून वीजनिर्मिती प्रकल्प, प्लास्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्प तसेच मेकॅनिकल कंपोस्टींग प्लँटला भेट देऊन तेथील माहिती घेतली.

याविषयी बोलताना काळजे म्हणाले की, मोशी कचरा डेपोतून येणा-या दुर्गंधीविषयी नागरिक वारंवार तक्रार करत असतात, त्यामुळे मी पहिल्यांदा या कचरा डेपोला भेट दिली. यावेळी तेथील प्रकल्पांची रखडलेल्या कामांची माहिती घेतली. यावेळी तेथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला चालना मिळावी यासाठी लवकरात लवकर निविदा काढा कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा,  अशा सूचना यावेळी केल्या, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील कचरा प्रश्नी शून्य कचरा प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी,  ‘निरी’ संस्थेने सुचविलेल्या उपायांप्रमाणे मोशी कचरा डेपोच्या बाजूने ग्रीन बेल्ट तयार करणे अशी बरीच कामे रखडली आहेत. दिवसें-दिवस वाढत जाणारा कचरा, त्यामुळे परिसरात पसरलेली दुर्गंधी अशा अनेक समस्या  आहेत. त्यासाठी महापालिकेने आत्तातरी ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.