प्रभाग क्रमांक 26 च्या निकालावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा आक्षेप

निकाल थांबवला

एमपीसी न्यूज- मशिनच्या मतदानामध्ये व मतमोजणीत गोंधळ आहे, असे म्हणत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्र.क्र.26 च्या निकालावर राष्ट्रवादी व काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.

त्यामुळे अंतिम निकाल हातात असूनही तो आक्षेपामुळे थांबवण्यात आला आहे. 26 मधून भाजपचे आरती चोंधे, ममता गायकवाड, तुषार कामठे, सनदीप कसपटे यांचा मतमोजणीनुसार विजय झाला आहे.

मात्र इवीएम मशिनमध्ये गडबड असून एका त्रयस्थ संस्थेद्वारे मतमोजणी पुन्हा करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज काँग्रेस व राष्र्टवादीच्या उमेदवारातर्फे करण्यात आला. यामध्ये काँग्रेसचे सचिन साठे, म्रुणाल साठे, भुलेश्वर नांदगुडे, संजिवनी जगताप, यांनी तर राष्ट्रवादीच्या स्वाती कलाटे, विलास नांदगुडे, लिलावती शिंदे, नितीन इंगवले यांनी आक्षेप घेतला आहे.

या आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकारी एम.आर.मिसकर यांनी निर्णय राखून ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.