पिंपरीत पक्षांतर केलेले 16 विद्यमान नगरसेवक पराभूत तर 10 विजयी

51 विद्यमान नगरसेवक पराभूत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पक्षांतर केलेल्या 16 विद्यमान नगरसेवकांचा पराभव झाला आहे. तर 10 नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. तसेच तब्बल 51 विद्यमान नगरसेवक पराभूत झाले आहेत.

 

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, अरुणा भालेकर, राजेंद्र जगताप, राजेंद्र काटे, बाळासाहेब तरस,  शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या संगिता पवार, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या शुभांगी बो-हाडे, संजय काटे, मनसेतून शिवसेनेत गेलेले अनंत को-हाळे, काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले भाऊसाहेब भोईर, जालिंदर शिंदे, विमल काळे, राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्या सुजाता टेकवडे, मंदाकिनी ठाकरे, आरपीआयमधून भाजपमध्ये गेलेल्या चंद्रकांता सोनकांबळे यांना पराभव सहन करावा लागला आहे.

 

शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संगीता भोंडवे, आशा शेंडगे, सीमा सावळे, काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या जयश्री गावडे, आरती चोंधे, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या सुजाता पालांडे, माया बारणे, शत्रुघ्न काटे, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले राहूल जाधव आणि काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या गिता मंचरकर निवडून आल्या आहेत.

 

51 विद्यमान नगरसेवक पराभूत झाले आहेत. शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, अरुणा भालेकर, स्वाती साने, मंदा आल्हाट, धनंजय आल्हाट, शारदा बाबर, नारायण बहिरवाडे, उल्हास शेट्टी, सुभद्रा ठोंबरे, संगिता पवार, सुलभा उबाळे, तानाजी खाडे, शुभांगी बो-हाडे, अश्विनी चिखले, भारती फरांदे, आर. एस. कुमार, प्रतिभा भालेराव, बाळासाहेब तरस, भाऊसाहेब भोईर, आशा सुर्यवंशी, शमीम पठाण, संदीप चिंचवडे, अनंत को-हाळे, सुजाता टेकवडे, मंदाकिनी ठाकरे, संजय वाबळे, वंसत लोंढे, आशा सुपे, जालींदर शिंदे, सुनिता गवळी, गुरुबक्ष पहलानी, सुनिता वाघेरे, प्रभाकर वाघेरे, प्रमोद ताम्हणकर, विमल काळे, अनिता तापकीर, कैलास थोपटे, विमल जगताप, संपत पवार, स्वाती कलाटे, विलास नांदगुडे, शकुंतला धराडे, राजेंद्र जगताप, सुषमा तनपुरे, अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, संध्या गायकवाड, राजेंद्र काटे, चंद्रकांता सोनकांबळे आणि संजय काटे या विद्यमान नगरसेवकांचा पराभव झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.