PCMC News: पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला 45 कोटींचा निधी

एमपीसी न्यूज – घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा व्यवस्थापनामध्ये अग्रेसर असलेल्या पिंपरी -चिंचवड महापालिकेला या सुविधा भक्कम करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून केंद्राने 44 कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

घनकचरा व्यवस्थापनामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका देशात आघाडीवर आहे. राज्यात पहिल्या चार पालिकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा क्रमांक लागतो. घनकचरा व्यवस्थापनापाठोपाठ पाणीपुरवठ्याची व्यवस्था असून त्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडला निधी देऊ केला आहे. 15 व्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील मिलियन प्लस सिटीसाठी 2021 आणि 22 या आर्थिक वर्षातील पाणीपुरवठा व्यवस्थापनात सुधारणा तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने संपूर्ण देशासाठी 799 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.

alandi news : आळंदी कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भक्ती सोपान पुलावर संरक्षक कठडे बसवणे आवश्यक

या एकूण निधीपैकी 44 कोटी 91 लाख 75 हजार 270 रुपयांचा निधी पिंपरी-चिंचवड पालिकेला मिळणार आहे. निधी प्राप्त करण्यासाठी पालिकेला प्रशासनाकडे विनियोग प्रमाणपत्र सादर केल्यावर निधी मिळेल. हा निधी खर्च करण्यास अटी आहेत. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन बळकट करण्याबरोबरच प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी निधी खर्च करावा लागणार आहे.

15 व्या वित्त आयोगातून पुणे, देहूरोड आणि खडकी कॅण्टोन्मेंट बोर्डालादेखील निधी प्राप्त होणार आहे. तिन्ही कटक मंडळांना पाणीपुरवठा सुधारणा व घनकचरा व्यवस्थापनासाठी हा निधी वापरणे बंधनकारक आहे. पुणे कॅण्टोन्मेंट बोर्डाला 1 कोटी 94 लाख 58 हजार 820 रुपये, देहूरोड कॅण्टोन्मेंट बोर्डाला 1 कोटी 83 लाख 25 हजार 583  रुपये, तर खडकी कॅण्टोन्मेंट बोर्डाला 1 कोटी 93 लाख 55 रुपयांचा निधी मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.