Vadgaon Maval : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजपाचे नगरपंचायतीस निवेदन

एमपीसी न्यूज – वडगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच त्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वडगाव नगरपंचायतीचे प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी याबाबत कोणत्याही उपाययोजना करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकांना दिवाळीची सुट्टी,मामाच्या गावाऐवजी दवाखान्यात घालवावी लागली असल्याचे निवेदन वडगाव शहर भाजपच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले आहे.

सदर निवेदन देतेवेळी भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, वडगाव भाजयुमो अध्यक्ष विनायक भेगडे, भाजयुमो सरचिटणीस अतुल म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर, प्रसिद्धी प्रमुख अमोल ठोंबरे तसेच सरचिटणीस कल्पेश भोंडवे, मकरंद बवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

PCMC News: पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला 45 कोटींचा निधी

वडगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत व त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहेत. या आजाराने थैमान घातलेले असताना नगरपंचायतीचे प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी अजून हि ढीम्मपणे असून अजुनही कोणत्याही प्रकारची उपाय योजना केल्याचे दिसून येते नाही, आधीच मागील काही दिवसांमध्ये वडगावच्या जनतेला ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले असताना आणि आता त्यात भर दिवाळी सारख्या सणासुदीला असलेली सुट्टी मामाच्या गावाला जाणे आधीच दवाखान्यात घालवावी लागली आहे.
सुस्तावलेले प्रशासन व सत्ताधारी यांनी लवकरात लवकर डेंग्यूच्या डासांचे व साथीच्या रोगांसाठी ठोस उपाय योजना करावी, औषध फवारणी करून जनतेला दिलासा दयावा अशी मागणी भाजपा शहर अध्यक्ष अनंता कुडे यांनी निवेदनात केली आहे.

या बाबतीतल्या गांभार्याची जाणीव प्रशासनाला करून देण्यासाठी वडगांव भाजपाने मुख्याधिका-यांना निवेदन दिले. यामध्ये डेंग्यूला आळा घालण्या संदर्भातल्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा विनंती वजा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.