Talegaon Dabhade : जपानमधील संधींसाठी भारतीय अभियंते उपयुक्त – रेन्या किकुची

एमपीसी न्युज – ‘सध्यस्थितीमध्ये भारतीय अभियंत्यांना जपानमध्ये मोठी संधी आहे. जपानमधील या संधीसाठी भारतीय तरुण उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन एससीसीआयपी प्रायव्हेट लिमटेड जपान या कंपनीचे चेअरमन रेन्या किकुची यांनी केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ते बोलत होते.

याप्रसंगी एलएससीएल रोबोटिक्सचे सीईओ प्रकाश डेव्हिड,संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ.विलास देवतारे,डॉ.नितीन धवस,डॉ.शेखर राहणे, डॉ.विनोद किंबहुने,डॉ.सागर जोशी, डॉ.नितीन शेरजे, महाविद्यालयाचे प्रबंधक विजय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

PCMC News: पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला 45 कोटींचा निधी

जपानमधील वेळेचे महत्त्व,जपानी कार्यसंस्कृती तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी या विषयी देखील किकूची यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. प्रकाश डेव्हिड यांनी परदेशी भाषा शिकण्याचे महत्त्व,जपानसारख्या देशातील नोकरीच्या संधी आणि जपानमधील भारतीयांसाठीची सध्याची अनुकूल स्थिती या विषयी मनोगत व्यक्त केले.

डॉ. देसाई यांनी नूतन संस्थेच्या परदेशी भाषा संदर्भांत धोरणांची माहिती याप्रसंगी दिली. संस्थेतील विद्यार्थी जपानी भाषेचे प्रशिक्षण घेत असून आगामी काळात नूतन संस्थेच्या विद्यार्थ्यांना परदेशातील नोकरीच्या संधी आम्ही देणार आहोत अशीही माहिती त्यांनी पुढे बोलताना दिली.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.