Raigad News : शासकीय अनास्थेमुळे रायगडावरील निवास व्यवस्थेचे बांधकाम रखडले – विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज – शिव छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगडावर मागील पाच वर्षांपासून सुरू असलेले निवास व्यवस्थेचे काम रखडले आहे, असा आरोप सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.

वेलणकर यांनी माहिती अधिकार अंतर्गत रायगडावर महाराष्ट्र पर्यटन विभाग मार्फत बांधण्यात येणाऱ्या बांधकामाची माहिती मागवली होती. ज्यामध्ये प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार 2017 साली कमला मंजुरी मिळाली असून 2019 पासून कमला सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

Vadgaon Maval : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजपाचे नगरपंचायतीस निवेदन

यावर भाष्य करण्यासाठी वेलणकर यांनी काढलेल्या पर्टकत म्हटले आहे की, अनेक वर्षे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवास व्यवस्था होती ज्यामध्ये 12 सूट्स आणि दोन डाॅरमेटरीज होत्या ज्यामध्ये मिळून जवळपास 125 लोकांची राहायची सोय होत असे. 2017 साली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या निवास व्यवस्थेचे नूतनीकरण करण्याचा घाट घातला ज्याला भारतीय पुरातत्व विभागाने सप्टेंबेर 2017 मध्ये मंजूरी दिली.मात्र प्रत्यक्षात काम सुरू व्हायला शासकीय कूर्म गती मुळे जानेवारी 2019 उजाडला. मला माहिती अधिकारात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दिलेल्या माहिती प्रमाणे आज रोजी पावणे चार वर्षानंतरही हे नूतनीकरणाचे काम अद्याप सुरूच आहे. या नूतनीकरणाची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करता असे जाणवते की येथे निवास व्यवस्था नाही तर शासकीय कार्यालये सुरू होणार असावीत.

शिव छत्रपतींची राजधानी असलेला रायगड हा स्थापत्य शास्त्राचा एक अद्वितीय नमुना असून हा किल्ला नीट बघायला किमान दोन दिवस लागतात. त्यामुळे तिथे निवास व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र शासकीय अनास्था आणि नूतनीकरणाची कूर्म गती यामुळे दुर्गप्रेमी शिवभक्त गेली पाच वर्षे या सोई पासून वंचित आहेत. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात रायगडावर अशी अवस्था असणे हे उद्वेगजनक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.