Pune : पुण्यात 1746 बड्या मालमत्तांची 5182 कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी – विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज – पुण्यात फक्त 1746 बड्या (Pune) मालमत्तांची 5182 कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. वसुलीसाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे आवाहन सजग नागरिक मंच पुणेचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केले आहे. यासंबंधीचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला सोमवारच्या माहिती अधिकार दिनात 1 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांची माहिती मागितली होती. ज्याच्या उत्तरात मला सोबत जोडलेली माहिती दिली गेली जी अत्यंत धक्कादायक आहे. 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असणारे फक्त 1746 थकबाकीदार असून त्यांच्याकडे 5182 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे दिसून येत आहे.

यापैकी 94 केसेस विविध कोर्टांमध्ये प्रलंबित आहेत ज्यामध्ये अडकलेली रक्कम 988 कोटी रुपये आहे. ज्यात फक्त दोन केसेस मध्ये अडकलेली रक्कम 565 कोटी रुपयांची आहे. *मोबाईल TOWER च्या 1061 केसेस असून ज्यात अडकलेली रक्कम 2427 कोटी रुपये आहे*. ही प्रकरणे पण अनेक वर्षे कोर्टात प्रलंबित असल्याचे वेलणकर यांना सांगितले गेले. गेली कित्येक वर्षे या सर्व केसेस कोर्टात प्रलंबित आहेत हे विधी विभागाचे संपूर्ण अपयश आहे.

SSC Exam : राज्यात 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

महापालिकेच्या विधी आणि मालमत्ता कर विभागाने विशेष कक्ष स्थापन करून या सर्व केसेस चा निकाल शीघ्र गतीने लागावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यातील किमान निम्म्या केसेस चा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला तरी मनपाला 1800 कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल. या यादीत 184 केसेस “दुबार” कर आकारणीच्या आहेत ज्यात अडकलेली रक्कम 576 कोटी रुपये आहे. ; ज्याची शहानिशा करून त्या या यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरु करणे आवश्यक आहे.

या यादीत 193 केसेस “dispute” म्हणून दाखवलेल्या आहेत ज्यात अडकलेली रक्कम 561 कोटी रुपये आहे. या केसेस मधील “dispute” तातडीने resolve करून पैसे वसूल करणे गरजेचे आहे. यामध्ये 79 कोटी रुपये संरक्षण खात्याची तर 56 कोटी रुपये महावितरणची थकबाकी आहे. पाटबंधारे खात्याची थकबाकी 73 कोटी रुपयांची असून त्याची वसुली महापालिका पाटबंधारे विभागाला देत (Pune) असलेल्या पाणी पट्टी मधून करणे आवश्यक आहे.

या संबंधीचे पत्र कर आकारणी प्रमुखांनी पाणीपुरवठा विभाग प्रमुखांना पाच वर्षांपूर्वी देऊनही अजून कार्यवाही झालेली नाही. अनेक थकबाकीदारांची प्रकरणे कोर्टात प्रलंबित नसल्याचे दिसत आहे. अशा थकबाकीदारांकडून तत्काळ वसुलीचे प्रयत्न होण्याची गरज आहे. या 1746 बड्या केसेस वर संपूर्ण लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त वसुली साठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. काही शे रुपयांची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या घरासमोर बॅंड वाजवण्यात महापालिकेचे रिसोर्सेस वाया घालवण्यापेक्षा या बड्या थकबाकीदारांकडून वसुली साठी सर्वंकष प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.