Pune : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिका सुरू करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक

एमपीसी न्यूज – रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेवरील (Pune) मेट्रो त्वरित सुरू करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड यांना शिवसेना ठाकरे गटाकडून निवेदन देऊन घेराव घालण्यात आला. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सुरू होण्यासाठीची मेट्रो मार्गीकेवरील सर्व कामे पूर्ण होऊन सुद्धा या मार्गावरील मेट्रो अजून झालेली नाही. महामेट्रो रेल कार्पोरेशनच्या वतीने ट्रायल रन यशस्वी झाल्याचे समजले. सद्यस्थितीत पुणेकरांना मेट्रो सेवा पुरवण्यासाठी मेट्रो मार्गिका योग्य असताना देखील रूबी हाॅल ते रामवाडी ही मेट्रो मार्गीका सुरू का होत नाही? याचा खुलासा आम्हाला आणि पुणेकरांना त्वरित देण्यात यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Pune : पुण्यात 1746 बड्या मालमत्तांची 5182 कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी – विवेक वेलणकर

सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशातून नागरिकांच्या सेवेसाठी मेट्रो उभी राहत असेल आणि ती मेट्रो नागरिकांच्या सेवेसाठी वेळेत उपलब्ध होत नसेल तर एवढे कोट्यावधी रुपये कशासाठी खर्च केले गेले, याचाही खुलासा त्वरीत देण्यात यावा. मेट्रो सुरू न करण्याचे खरे कारण ऐकण्यास सर्वसामान्य जनता आतुर आहे. सध्या योग्य मुहुर्त नाही का? की कोणा वरिष्ठांची कुंडली दाखवून मुहुर्त काढणार आहात? ज्यांच्या हस्ते उद्घाटन सध्या शनिवक्री आहे का? जेणेकरून उदघाटनानंतर मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी त्यांचा सुकाळ असावा याची वाट पहात आहात? कोणाच्या राजकीय दबावापुढे झुकून आपण मेट्रो मार्गीका बंद ठेवली आहे? जर उद्घाटनासाठी नेत्यांची वेळ मिळत नसेल आणि त्या अभावी मेट्रो सुरु होत नसेल तर जे लाखो नागरिक तिकीट काढून या सेवेचा लाभ घेणार आहेत, त्यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात यावे. आणि पुणेकरांसाठी तयार असलेली मेट्रोची सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पुणे शहराच्या वतीने करण्यात आली.

यावेळी मेट्रो प्रशासनाच्या वतीने आठवड्या भरात मेट्रो चालू केली जाईल, असे सांगण्यात आले.

यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राजेंद्र शिंदे, उमेश वाघ, प्रवीण डोंगरे, चंदन साळुंके, मुकुंद चव्हाण, राजेश मोरे, किशोर रजपूत, अजय भुवड, संदिप (Pune) गायकवाड, उमेश गालिंदे, महेश पोकळे, बाळासाहेब भांडे, संजय वाल्हेकर, मकरंद पेठकर, नितीन वाघ, संतोष शेलार, अतुल दिघे, नागेश खडके, झुबेर तांबोळी, करुणा घाडगे, संतोष भूतकर, सचिन घोलप,रमेश जुनवणे, संतोष ओरसे, रणजीत शिंदे, ज्युबेर तांबोळी, इमरान खान, संतोष ओरशे, विकी धोत्रे, राहुल शेडगे , फैझन पटेल , राम परदेशी, हरी सपकाळ, उपस्थित होते .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.