विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी नृत्य शिक्षकाला 5 दिवसाची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडेमध्ये नृत्य शिकण्यासाठी येणा-या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. ही घटना काल बुधवारी (दि.1) घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक करत वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

रघू नरसिंह बोडिके (वय 25 रा. वराळे ता. मावळ जि. पुणे मूळ आंध्र प्रदेश ), असे आरोपी नृत्य शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रघू बोडिके हा नृत्य कला वर्ग चालवितो. पीडित विद्यार्थीनी ही नृत्य शिकण्यासाठी काल बुधवारी आली असता, एकांताचा फायदा घेत आरोपीने बलात्कार केला. दरम्यान, सकाळी 9.00 वाजल्यापासून न्यृत्य क्लासला गेलेली मुलगी दुपारी 3 वाजेपर्यंत घरी न आल्याने तिच्या आईने तिचा शोध घेतला. यावेळी आरोपी पीडित विद्यार्थीनीला दुचाकीवरून घेऊन जाताना दिसला.  घडलेला प्रकार पीडित विद्यार्थीनीने तिच्या आईला सांगितला. तिच्या आईने आरोपीवर बलात्कार केल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात केल्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी रघू बोडिके याला सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिगावकर यांनी (दि.1) बुधवारी दुपारी 3 वाजता वडगाव  मावळ न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी न्यायाधिशांनी रविवारपर्यंत (दि.5) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान तळेगावात एकाच आठवड्यात बलात्काराच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा लावल्याच्या या घटनेचा परिसरात निषेध व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.