बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

कात्रज उद्यानातील फुलराणीला अपघात, एकाचा हात फॅक्चर

एमपीसी न्यूज – कात्रज उद्यानातील फुलराणीचा पहिल्या डब्याचा अचानक अॅक्सल तुटल्याने आज संध्याकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये एका व्यक्तीचा हात फॅक्चर झाला आहे.

 

या विषयी स्थानिक नगरसेवक वसंत मोरे म्हणाले की, पुणे शहर आणि विविध भागातून नागरिक कात्रज तलावातील फुलराणीला भेट देतात आणि त्यातून फिरतात देखील. आज नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या दरम्यान चारही डब्यात मिळून 15 ते 16 लोक बसले होते. फुलराणी सुरू झाल्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक पहिल्या डब्याचा अॅक्सल तुटला. यामुळे यातील अमोल हर्षे वय 43 यांचा हात फॅक्चर झाला असून काही नागरीक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

 

त्याचबरोबर हा अपघात कसा घडला याचे नेमके कारण अमरावतीवरून उद्या ज्या कंपनीने डब्बे तयार केले. त्यांची टीम येणार आहे. त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळेल, असे त्यांनी सांगितले.

spot_img
Latest news
Related news