Pimpri News: खूशखबर! पवना धरणात 50 टक्के पाणीसाठा

आठ दिवसांत 17 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ. 50% water storage in Pavana dam.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणात 49.50 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील आठ दिवसात धरणातील साठ्यात 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकर, मावळवासीयांची पाण्याची चिंता कमी झाली आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. मागील नऊ महिन्यांपासून शहरवासीय दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. त्यातच जून, जुलै संपला तरी पावसाचे आगमन झाले नव्हते.

त्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. 31 जुलैपर्यंत धरणात 33.60 टक्के पाणीसाठा होता. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करण्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले होते.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. पवना धरण क्षेत्रात चार दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

मागील आठ दिवसात धरणातील साठ्यात 17 टक्यांनी वाढ झाली आहे. आजमितीला धरणात 49.50 टक्के पाणीसाठा असून धरण अर्धे भरले आहे.

तर, 1 जूनपासून आजपर्यंत 772 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. कालपासून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे.

याबाबत बोलताना पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले, ”मागील चार दिवस पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.

आज धरणात 49.50 टक्के पाणीसाठा आहे. कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. आज दिवसभरात केवळ 3 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.