Girl abuse : सात वर्षीय मुलीशी असभ्यवर्तन करणाऱ्या 50 वर्षीय नराधमाला अटक

एमपीसी न्यूज – खेळत असणाऱ्या सात वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्याशी अस्भ्य वर्तन करत तिचे लैंगीक शोषण करणाऱ्या नराधमाला वाकड पोलिसांनी अटक केले आहे. (Girl abuse) हा प्रकार काळेवाडी फाटा येथे गुरुवारी (दि.3) घडला.

याप्रकरणी मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी भाऊसाहेब माणिकराव गायकवाड (वय 50 रा. थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Pune crime : कारागृहात शिपाई असलेल्या पत्नीला पट्ट्याने मारहाण; पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी यांची 7 वर्षांची मुलगी तिच्या मित्र-मैत्रीणीसोबत घराजवळ खेळत होती. यावेळी आरोपी तेथे आला व त्यानेइतर मुलांना तेथून हाकलून दिले.(Girl abuse) व पीडित मुलीला फरसाण खायला दिले. त्यानंतर त्याने तिला बाजूला नेत तिच्याशी असभ्यवर्तन करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पालकांना कळताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी ही नराधमाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.