Girl molested : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी अटक

एमपीसी न्यूज –  अल्पवयीन मुलीचा तिच्या आईचा विनयभंग करत तिला व तिच्या घरच्यांना माराहाण करून घरात कोंडणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. (Girl molested) हा प्रकार गुरुवारी (दि.3) चिंचवड येथे घडला.

याप्रकरणी पीडित मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गणेश तायाप्पा कोनमणे (वय 24 रा.चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Girl abuse : सात वर्षीय मुलीशी असभ्यवर्तन करणाऱ्या 50 वर्षीय नराधमाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आईसह दरात कपडे वाळत घालत होती. यावेळी आरोपीने काही कारण नसताना पीडीत मुलगी व तिच्या आईशी असभ्य वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. त्यांनी विरोध केला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.(Girl molested) तसेच फिर्यादीच्या मोठ्या बहिणीलाही मारहाण करत तिघींना त्याने घरात कोंडून बाहेरून कडी लावली. यावरून निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.