Nigdi: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज – पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि.7)सकाळी साडेआठच्या सुमारास निगडी येथे घडली.

कचरु श्रीपती डोळसे (रा. रुपीननगर, तळवडे) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा आकाश डोळसे (वय 26) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम 14, जीडी 8002 या क्रमाकांच्या ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी कचरु डोळसे हे एम.एच 14 जीजी 2697 या दुचाकीवरुन दुर्गानगरला जात होते. त्यावेठी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील (एम 14, जीडी 8002) ट्रकने डोळसे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये डोळसे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.