Kalewadi : सेलिब्रिटींना सोशल मीडियावर फॉलो, लाईक करण्याचे आमिष दाखवत सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर सेलिब्रिटींना फॉलो आणि लाईक करायचे काम असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन करत तिची सुमारे सात लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 18 ते 22 एप्रिल या कालावधीत जोतिबानगर, काळेवाडी (Kalewadi) येथे घडली.

Gold Rates – आजचे सोने-चांदी भाव

रवी विक्रम खुणे (वय 36, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9631008077 या क्रमांकावरून बोलणारी महिला अदिती (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी यांना फोन करून ती एका कंपनीची व्यवस्थापक असल्याची तिने ओळख सांगितली. इंस्टाग्रामवर सेलिब्रिटींना फॉलो व लाईक करायचे पार्ट टाईम काम आहे.

 

तसेच टेलिग्रामवरील काही टास्क पूर्ण केल्यास त्याचा आर्थिक मोबदला मिळेल असे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. प्रीपेड टास्क पूर्ण करताना चूक झाल्याने व्हीआयपी अपग्रेडेशनसाठी तसेच कराच्या नावाखाली फिर्यादीकडून आरोपी महिलेने सहा लाख 93 हजार 500 रुपये एवढी रक्कम घेत फिर्यादीची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.