Chakan : किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी ; सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- शेतातून नेण्यात आलेल्या पाईपलाईनच्या वादातून दोन गटांमध्ये कोयते, लाकडी दांडकी, खोऱ्याने हाणामारी करण्यात आल्याची घटना निघोजे ( ता. खेड) येथे शनिवारी (दि.29) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून एकूण सात जणांवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास महादू येळवंडे (वय 50) व बायडाबाई कैलास येळवंडे (वय 45) , किरण पिराजी पानसरे (वय 48) व कैलास पिराजी पानसरे (सर्व रा. निघोजे, ता. खेड) अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. कैलास येळवंडे यांनी या बाबत चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार शेतातून पाईपलाईन घेण्याच्या कारणावरून संगनमताने फिर्यादी व त्यांच्या पत्नीस किरण पिराजी पानसरे, दर्शन बाळासाहेब पानसरे, अमित बाळासाहेब पानसरे व कैलास पिराजी पानसरे (सर्व रा. निघोजे ता. खेड) यांनी मारहाण केली. त्यांच्या फिर्यादिवारीन संबंधित चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण पिराजी पानसरे ( वय 48) यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पाईप लाईन शेतातून घेतल्याच्या कारणावरून कैलास महादू येळवंडे ( वय 50) बायडाबाई कैलास येळवंडे(वय ४५) व त्यांचा मुलगा समीर कैलास येळवंडे यांनी संगनमताने लोखंडी कोयत्याने मारहाण करून फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ कैलास पानसरे यांस गंभीर जखमी केले. त्यानुसार कैलास येळवंडे त्यांची पत्नी व मुलावर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत. मारहाणीतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.