Pune : ‘गाजर’वाल्यांच्या विरोधात ‘जागर’ म्हणत शिवसेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील समस्यांसाठी शिवसेनेने पुणे महापालिकेवर मंगळवारी (दि. 9) ‘जागर मोर्चा’ काढला. केंद्रात, राज्यात सत्ता असूनही भाजपा पुणे शहराच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत शिवसेनेने हा मोर्चा काढला तर या मोर्चाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शनिवारवाडयापासून ते पुणे महापालिकेवर जागर मोर्चा काढण्यात आला. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी शहर प्रमुख माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, पुणे महापालिकेतील गटनेते संजय भोसले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता येऊन चार वर्षांचा कालावधी झाला आहे. तसेच पुणे महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता येऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अजूनही पुणे शहराचे प्रश्न सोडवण्यात भाजपा सरकार अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेनेने केला.

मोर्चातून शिवसेनेने काय केल्या आहेत मागण्या ? 

1) वाहतूक व्यवस्था
2) 24/7 पाणीपुरवठा
3) जुने वाडे व झोपडपट्टी पुनर्वसन योजना
4) कचरा कोंडी
5) नदी सुधारणा प्रकल्प
6) चांदणी चौकातील उड्डाणपूल
7) शिवसृष्टी
8) डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण
9) बेकायदेशीर होर्डिंग्ज
10) हॉकर्स झोन पॉलिसी
11) पूरग्रस्त वसाहतीच्या नागरिकांना हक्काची घरे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.