Pune : शिवसेनेने फोडले पीक विमा कंपनीचे कार्यालय

एमपीसी न्यूज – शेतक-यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतक-यांना पिक विमा मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी आज (बुधवारी) पुण्यातील पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यातील इफको टोकियो पिक विमा कंपनीचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

‘रब्बी आणि खरीप हंगाममध्ये नुकसान झालेल्या शेतक-यांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘शेतक-यांना पिक विमा मिळालाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. कार्यालयातील खुर्च्या टेबलची तोडफोड करण्यात आली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे सगळ्यांचीच धावपळ झाली. दरम्यान, शिवसेनेने शेतक-यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.