BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ कार अपघातात महिलेचा मृत्यू ; एकजण जखमी

0

एमपीसी न्यूज- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा ते मळवली दरम्यान असलेल्या औंढे पुलाजवळ भरधाव कार रस्त्यांच्या कडेला लावलेल्या लोखंडी पत्र्याला धडकून रस्त्यावर उलटल्याने एका महिलेचा मृत्यु झाला तर एक जण जखमी झाला. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघाताची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस व रस्ते विकास महामंडळाचे सुरक्षा पथक तसेच प्रवासी यांनी सदर गाडीत आडकलेल्या जखमी व्यक्तीला बाहेर काढत रुग्णालयात रवाना केले.

HB_POST_END_FTR-A2

.