Pimpri: …..जेव्हा आयुक्त श्रावण हर्डीकर मिमिक्री करतात ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर एक चांगले कलाकार देखील आहेत याचा प्रत्यय महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आला. आयुक्तांनी एका काल्पनिक राजकीय पुढाऱ्याच्या भाषणाची मिमिक्री करत कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. आयुक्तांच्या कलेला उपस्थित पदाधिकारी, अधिकारी कर्मचा-यांनी दाद दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी (दि.11) सायंकाळी भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे उपस्थित होते

नेहमी धीरगंभीर, कधी हसमुख असणारे आयुक्त श्रावण हर्डीकर स्टेजवर उभे राहिले अन्‌ त्यांनी चक्क मिमिक्री करण्यास सुरुवात केली. एका काल्पनिक राजकीय पुढाऱ्याच्या भाषणामधून त्यांनी एका विषयावरून एकदम दुसऱ्या विषयावर जात केलेल्या असंबद्ध भाषणामधून उपस्थितांचे चांगले मनोरंजन झाले. त्यांच्या मिमिक्रीला पदाधिकारी, अधिका-यांनी दाद दिली. या कार्यक्रमातून आयुक्तांमधील उत्तम कलाकार बाहेर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.