Pune : अंनिसवर बंदी घाला ; अतुल छाजेड यांची मागणी

एमपीसी न्यूज – अंनिस समाजात भोंदुगिरी पसरवत असल्याने शासनाने या संस्थेवर बंदी घालून कायद्याने कारवाई करण्याची मागणी पुणे येथील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा मानणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधात ज्योतिषाचार्य अतुल छाजेड पुन्हा एकदा समोर आले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. आव्हान स्वीकारण्यास सिद्ध असूनही अंनिसचे कार्यकर्ते माझ्यासमवेत येत नाहीत, असे अतुल छाजेड यांनी म्हटले आहे. अंनिस समाजात भोंदुगिरी पसरवत असल्याने शासनाने या संस्थेवर बंदी घालून कायद्याने कारवाई करण्याची छाजेड यांनी मागणी केली आहे.

दरम्यान, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास मधुकरराव भाले यांनी मंत्रोच्चार केल्याने पिकाची वाढ होत असल्याचा दावा केल्याचे सांगत अतुल छाजेड यांनी आपण देखील या मताशी सहमत असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.