Talegaon : राष्ट्राची उभारणी आणि समाजाच्या प्रगतीत वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा

एमपीसी न्यूज – शेकडो वर्षांपासून वारकरी संप्रदायाने कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रध्दा आणि अनिष्ठ रुढीवर घणाघात करून समाजप्रबोधन करण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. राष्ट्राची उभारणी आणि समाजाच्या प्रगतीत वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे,
असे प्रतिपादन संत तुकाराम साखर कारखाण्याचे ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे यांनी केले.

इंदोरी (ता.मावळ) येथील कै.ह. भ. प. विष्णुजी गणपत काशिद (पाटील) यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या कार्यगौरव पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी विलास भेगडे आणि ऋषीकेश लोंढे(पत्रकारिता),गुलाबराव ढोरे(युवा उद्योजक),दशरथ ढमढेरे(शैक्षणिक),दामोदर शिंदे(सामाजिक),एड. खंडूजी तिकोणे(वकीली),विक्रम पवार(आदर्श ग्रामपंचायत सदस्य),मुकाई मित्र मंडळ(सामाजिक उपक्रम),,सुनीता हिंगे(आदर्श माता) यांना माऊली दाभाडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विलास मालपोटे,उपाध्यक्ष सचिन काशीद, काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष संभाजी लेंडघर,सुनील काशीद, उपसरपंच दिनेश चव्हाण,माजी उपसरपंच अंकुश ढोरे,आशिष ढोरे,मनोहर काशीद,,ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पानसरे,अशोक झगडे,लक्ष्मण मखर,मंगला काशीद,तालुका युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वैष्णवी झगडे,तपस्या गुंजाळ आदी उपस्थित होते.सत्कार्थींच्या वतीने एड. खंडुजी तिकोणे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक मुख्य संयोजक विजय काशिद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रूपेश शिंदे यांनी केले .वैष्णवी झगडे यांनी आभार मानले.दरम्यान,ठाणे जिल्ह्यातील अमाणे-लोनाड परिसर दिंडीचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.वारकरी आणि भाविकांसाठी अन्नदान करण्यात आले.यावेळी झालेल्या कीर्तनात ह.भ .प .वासुदेव महाराज पाटील यांनी प्रबोधन करताना सांगितले,’संतांची संगत घडण्यासाठी पुण्य हवे .मनुष्याने पारमार्थिक गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिल्यास जीवनाला दिशा मिळेल.परमात्मा त्रिगुणात्मक आहे. मनुष्य कर्मात बांधलेला आहे. परमार्थात सुख घडोघडी वाढू लागते.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.