Chikhali : चिखलीतील’एसटीपी’ला स्थानिकांचा विरोध

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे रिव्हर रेसिडेंन्सीच्या मागील बाजूस सुरु असलेल्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पाच्या (एसटीपी) कामाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. तसेच ‘एसटीपी’चे काम रद्द करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी देखील ‘एसटीपी’ला विरोध दर्शविला असून रद्द करण्याची मागणी केली आहे. 

रिव्हर रेसिडेंन्सीच्या परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. प्रकल्पाचे काम स्थगित करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात  रिव्हर रेसिडेंन्सी, ऐश्वर्यम, स्वराज, स्पारा, क्रिस्टल व क्‍लॉलेस्स सोसायटीमधील नागरिक सहभागी झाले होते.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, हा प्रकल्प पूररेषा निळी आणि लालरेषा अंतर्गत येत असल्याने प्रस्तावित एसटीपी हा प्रकल्प अनधिकृत आहे. महापालिका अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई करीत असताना स्वत: अवैध बांधकाम करीत आहे. हा प्रकल्प झाल्यास या परिसरातील नागरिकांना भविष्यात अनेक समस्यांना सामारे जावे लागेल. वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण, पर्यावरण हानी, आरोग्याच्या समस्या उद्‌भवणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांचा या प्रकल्पास तीव्र विरोध आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम त्वरित बंद करावे. अन्यथा उच्चन्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा साने यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.