Chikhali : त्रिवेणीनगरमध्ये थायरॉईड तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – आयकॉन हॉस्पिटलच्या वतीने अल्पदरात थायरॉईड तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार (दि. 7) व शुक्रवार (दि. 8) मार्च रोजी हे शिबिर तळवडे रोड, टॉवर लाईन, त्रिवेणीनगर येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये होणार आहे.

वजन वाढणे किंवा कमी होणे, केस गळणे, थकवा व अशक्तपणा जाणवणे, मासिक पाळी अनियमितता तसेच अती रक्तस्त्राव होणे, हात व पायाचा थरकाप होणे, झोप न लागणे, ह्दयाची धडधड व ब्लडप्रेशर कमी जास्त होणे, अशी लक्षणे आढळ्यास तसेच 40 वयोगटावरील नागरिकांनी थायरॉईडची तपासणी करणे गरजेचे आहे, अशी माहिती डॉ. महेश मारणे, डॉ. रोहन काटे यांनी दिली. शिबिरात सहभागी होण्यासाठी रूग्णांना नावनोंदणी करणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.