Bhosari : मेस चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटले

एमपीसी न्यूज – मेस चालकाला व त्याच्या भावाला चाकूचा धाक दाखवून त्रिकुटाने 1 हजार 700 रूपयांची रोकड लुटून नेली. हा प्रकार आळंदी रोड येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

विलास धाबु ढेबे (वय-22, रा. भारतमातानगर, दिघी), अजय उत्तम भंडारे (वय-21, रा. मोहल्ला प्रियदर्शनी शाळेजवळ, दिघी) या दोघांना अटक केली असून नितीन सूर्यवंशी (वय-18, रा. भोसरी) हा पसार झाला आहे. याप्रकरणी भीम नागनाथ पांचाळ (वय-28, रा. सोनवणे वस्ती, हनुमान कॉलनी, शास्त्री चौक, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांचाळ यांची आळंदी रोड येथील शास्त्री चौकात वैभव नावाने मेस आहे. शुक्रवारी दुपारी फिर्यादी व त्यांचा भाऊ मेसमध्ये होते. आरोपी विलास ढेबे याने फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून खिशातील 1 हजार 700 रूपयांची रोकड जबरदस्तीने लुटून नेली.  भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.