Chikhali : पैशाच्या वादातून महिलेला बॅटने मारहाण, तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पैशाच्या वादातून एका महिलेला बॅटने मारहाण केली. तर दोघांनी शिवीगाळ करत ‘तू इथे कशी राहते ‘, अशी धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी चिखली येथे साडेअकरा वाजता घडली.

जयश्री विष्णु सावंत, महेश सावंत, कमलाबाई सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैशाली विजय कोईमारे (वय-32, रा. लक्ष्य सोसायटी, पुर्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपी जयश्रीकडून पैसे घेतले होते. शुक्रवारी आरोपी व फिर्यादीमध्ये पैशांवरून वाद झाला. जयश्रीने फिर्यादीला ‘माझे उर्वरित पैसे दे, तू माझ्यामुळे मोठी झाली, तुझे कॅरेक्टर चांगले नाही, माझे पैसे दिले नाही तर तुला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. तसेच फरशीवर ढकलून देत लाकडी बॅटने पायावर मारहाण केली. आरोपी महेश व कमलाबाईने शिवीगाळ करत ‘तू इथे कशी राहते’, अशी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.