BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग ; महिलेचा पतीवर संशय

805
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – अज्ञात व्यक्तीने महिलेच्या मोबाईल फोनवर अश्लील व्हिडिओ पाठवून तसेच व्हिडिओ कॉल करून तिचा विनयभंग केला. ही घटना काळेवाडी येथे 4 मार्च रोजी दुपारी घडली. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून महिलेचा तिच्या पतीवर संशय आहे.

याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या पतीपासून मागील दोन वर्षांपासून वेगळी राहत आहेत. त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 4 मार्च रोजी फिर्यादी महिलेला अज्ञात व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला. तसेच अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवून त्यांचा विनयभंग केला. याबाबत त्यांनी त्यांच्या पतीवर संशय असल्याचे सांगितले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भोगम तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3