Pune : कला, साहित्य निसर्गविषयक प्रेम रुजविण्यासाठी ‘जिप्सी क्लब’ ची स्थापना

एमपीसी न्यूज- आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्यात प्रत्येकाला निसर्ग, कला, संगीत, इतिहासप्रेमात रममाण करण्यासाठी उद्योगनगरी पिंपरी -चिंचवड आणि विद्यानगरी पुण्यात ‘जिप्सी क्लब ‘ची स्थापना होत आहे. युवक,युवती, महिला आबालवृद्धाना हे नवे दालन उपलब्ध होत आहे.
संस्थापक निनाद थत्ते यांनी ही माहिती दिली.

पिंपरी -चिंचवड, पुणे या ठिकाणी जिप्सी क्लबचे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. भटकंती, ट्रेकिंग पासून साहित्य,संगीत, कला अशा गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी या क्लबची स्थापना करण्यात येत आहे. प्रत्येक महिन्यात अशी वेगळी वाट धुंडाळणारे भटकंती, साहित्य,संगीत, कला अशा क्षेत्रातील जिप्सीशी गप्पा, साहस, निसर्ग, इतिहास अशा विषयांवर आधारित वर्षातून एक चित्रपट महोत्सव /रसग्रहण, अनुभव कथन, फोटो आणि पेंटिंग्ज, त्यांनी जोपासलेल्या छंदाचे प्रदर्शन, दासबोध अभ्यास वर्ग असे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. शास्त्रीय पद्धतीने दुर्ग संवर्धनासाठीचे प्रयत्न, स्मृतिवन – डोंगर /गडांवर शास्त्रीय पद्धतीने वृक्षारोपण, अक्षय ऊर्जा असे उपक्रमही हाती घेतले जाणार आहेत .

अधिक माहितीसाठी,नोंदणीसाठी जिप्सी क्लब, निनाद थत्ते, मोबाईल नंबर 96899 38912 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.