Chikhali : रिक्षा घेण्यासाठी विवाहितेची छळ

एमपीसी न्यूज- रिक्षा घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्याची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकणारी रविवारी (दि.21) पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पीडतेचा पती सुहास सुरेश बोराटे (वय-31) याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा 2014 साली आरोपीशी विवाह झाला त्यानंतर त्याने पीडितेला तुझ्या वडिलांकडून रिक्षासाठी व दारुसाठी पैसे घेऊन ये म्हणत पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही म्हणून मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडितेने चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.