Pimple Gurav : सेफ्टी डोअर उचकटून तीन लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज- सेफ्टी डोअर उचकटून घरात घुसलेल्या चोरट्याने घरातील तीन लाखांचे दागिने लंपास केले. रविवारी (दि. 21) रात्री साडेआठ ते बाराच्या दरम्यान पिंपळे गुरव परिसरात घटना घडली.

याप्रकरणी अंजली घनशाम गोरवाणी (वय-42 रा.पिंपळे गुरव) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाहेरगावी गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील 11 तोळे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 96 हजार 500 रुपयांचा एवज चोरून नेला आहे. याचा सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.