Chinchwad : पगारातील पैशाची मागणी करीत विवाहितेला मारहाण

एमपीसी न्यूज- दुसरा विवाह करून पहिल्या पत्नीला तिच्या पगारातील पैसे मागत छळ करण्यात आला. या प्रकणारी रविवारी (दि.२८) संबंधित पतीवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पत्नीने फिर्याद दिली असून संदीप तुकाराम उदमले (वय-50 रा.शिवणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बेकायदेशीररित्या दुसरा विवाह करुन पीडितेला खर्चासाठी तिच्या पगारातील पैशांची मागणी केली. तिने देण्यास नकार दिला असता तिला वारंवार मारहाण व शिवीगाळ करण्यात आली यावरून चिंचवड पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.