Today’s Horoscope 19 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग वार – शनिवार, 19 जून 2021
- शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
- आज विशेष – महेश नवमी.
- राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
- दिशा शूल – पूर्वेस असेल.
- आजचे नक्षत्र – हस्त 20.28 पर्यंत नंतर चित्रा.
- चंद्र राशी- कन्या.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग – डाळिंबी)
दिवस तितकासा अनुकूल नसला तरीही आज काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील. कोणतेही निर्णय उताविळ पणे घेऊ नका. जिभेचे चोचले पुरवू नका. पोट बिघडेल.
वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता)
नोकरदारांना काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. रुग्णांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकेल. गृहिणी आज संध्याकाळी मॉलमध्ये फेरफटका मारतील.
मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)
शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. कलाकारांना कामे मिळवण्यासाठी स्ट्रगल करावी लागेल.
कर्क– (शुभ रंग – राखाडी)
आज कार्यालयीन कामासाठी काही जवळपासचे प्रवास घडतील. अधिकारी वर्गाने कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे. घरगुती जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल.
सिंह – (शुभ रंग- भगवा)
आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचेही विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. आर्थिक स्थिती चांगली असून मानसिक स्वास्थ्य ही उत्तम असेल. गृहिणी पाहुण्यांची ऊठबस आनंदाने करतील.
कन्या– ( शुभ रंग – हिरवा)
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. कार्यक्षेत्रात पूर्वीच्या सर्वांचे चीज होईल व यशाची चाहूल लागेल. जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल.
तूळ – ( शुभ रंग- केशरी)
ज्येष्ठ मंडळींनी आज प्रकृतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. देण्यघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात करावेत. दूरच्या प्रवासात काही चांगल्या व्यक्तींशी हितसंबंध जुळून येतील.
वृश्चिक– ( शुभ रंग- नारंगी)
व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. ध्यानीमनी नसताना काही जुनी येणी वसूल होतील.
धनु – ( शुभ रंग- गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दोन हात दूरच रहा.
मकर– ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्हाला कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळीत मिळून-मिसळून राहणे गरजेचे आहे. ज्येष्ठांना सत्संगाची ओढ लागेल.
कुंभ – (शुभ रंग- आकाशी)
आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही.
मीन– ( शुभ रंग- मोरपंखी)
घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. वैवाहिक जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटले तरी हातचे राखूनच बोलणे हिताचे राहील.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)