-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News : कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनासाठी महापालिका ‘एचए’ला देणार 25 कोटी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील हिंदूस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची परवानगी मिळाल्यास लसनिर्मितीसाठी महापालिका कंपनीला 25 कोटी रुपये देणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने एकमताने मान्यता दिली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत अत्यंत अल्पप्रमणात लसीचा पुरवठा होत आहे. परिणामी, शहरातील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. शहरातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे. त्यासाटी लस उपलब्ध व्हावी. याकरिता हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीस  लस निर्मितीबाबत परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे.

कंपनीला लस निर्मितीची परवानगी मिळाल्यास लसनिर्मितीसाठी  कंपनीला महापालिकेकडून 25 कोटी रुपये मदत देणे आवश्यक आहे. कंपनीने लस निर्मिती केल्यास त्याचा सर्वात जास्त फायदा शहरातील नागरिकांना होणार आहे. त्यासाठी कंपनी सोबत महापालिकेने आवश्यक तो करारनामा करावा. त्यामध्ये लस निर्मितीनंतर शहरातील नागरिकांच्या लसीकरणासाठी कंपनीने महापालिकेस प्रथम आवश्यक तेवढी लस प्राधान्याने उपलब्ध करुन द्यावी, अशी घाट घालण्यात आली आहे.  कंपनीला लसनिर्मितीसाठी 25 कोटी रुपये देण्यास महासभेने मान्यता दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.