Maharashtra Corona Update : देशातील मृत्यू दरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यू दर अधिक, आज 198 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील नव्यानं वाढ होणा-या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. दररोज दोनशे ते दोनशेहून अधिक मृतांची नोंद होत. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा देशाच्या मृत्यू दरापेक्षा अधिक असून, तो दोन टक्क्यांजवळ पोहचला आहे. तर देशाचा मृत्यू दर 1.28 टक्के एवढा आहे. राज्यात आज 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी (दि.18) 9 हजार 798 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 59 लाख 54 हजार 508 एवढी झाली आहे. त्यापैकी 56 लाख 99 हजार 983 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 14 हजार 347 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

आजघडीला राज्यात 1 लाख 34 हजार 747 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 1 लाख 16 हजार 674 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.96 टक्के एवढा आहे. तर, राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 95.73 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 90 लाख 78 हजार 541 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 8 लाख 54 हजार 461 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 831 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.