Alandi : संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ वारकरी आणि धारकऱ्यांमार्फत आळंदीत दुग्धाभिषेक

एमपीसी न्यूज : आज सकाळी आळंदी (Alandi) नगरात पुण्यश्लोक श्री शिवाजी महाराज मूर्तीजवळ संभाजी भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आंदोलन आणि दुग्धाभिषेक करण्यात आला.

गेले काही दिवस भिडे गुरुजींच्या भाषणातील अर्धवट भाग दाखवून प्रसार माध्यमांतून अत्यंत खालच्या स्तरावर टीका सुरू आहे. अनेक नेतेमंडळी याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी वापर करत आहेत. भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांना ही बाब खटकत होती. म्हणूनच आज आळंदी येथील श्री शिवाजी महाराज मूर्तीला आणि भिडे गुरुजींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला, अशी प्रतिक्रिया श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

Nigdi : येत्या शनिवारपासून प्राधिकरणात रंगणार रौप्य महोत्सवी स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव

या प्रसंगी भिडे गुरुजींना समर्थन देण्यासाठी खेड तालुक्यातील आळंदी देवाची व पंचक्रोशीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी तसेच वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी  (Alandi) यांनी महापुरुषाबद्दल वादग्रस्त विधान केल्याची घटना घडली. यावरून राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भिडे गुरुजींचे समर्थकही आंदोलन करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.