Nigdi : येत्या शनिवारपासून प्राधिकरणात रंगणार रौप्य महोत्सवी स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित (Nigdi) रौप्य महोत्सवी स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव येत्या शनिवारपासून रंगणार असून शनिवार, रविवार व मंगळवारी नृत्य, गायन व वादनाच्या बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या वेळच्या स्वरसागर महोत्सवात शनिवारी म्हणजे 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रम सुरु होणार आहेत. शनिवारी सुरुवातीला सायंकाळी सहा वाजता बॉलिवूड क्लासिकल गीते संदीप उबाळे, अली हुसेन, अभिलाषा चेल्लम व संपदा गोडबोले सादर करतील.

त्यांना केदार परांजपे आणि सचिन जांभेकर साथसंगत करतील. त्यानंतर नृत्यकला मंदिरतर्फे गुरु तेजश्री अडीगे व विद्यार्थिनी भरतनाट्यम नृत्य सादर करतील. तसेच पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उदघाटन होईल. पुढील सत्रात वाद्यसंगीत सादर करण्यात येईल. शशांक सुब्रह्मण्यम – बासरी, पत्री सतीश कुमार -मृदुंगम, ओजस अढीया – तबलावादन सादर करतील.

महोत्सवाच्या दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी(13 ऑगस्ट) सायंकाळी जलदिंडी प्रतिष्ठान आयोजित पर्यावरणावर आधारित समूह गायनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर नुपूर नृत्यालयाच्या डॉ. सुमेधा गाडेकर व विद्यार्थिनी तत्वम – कथक व त्यापलीकडे हे नृत्य सादरीकरण करतील. त्यानंतर ओ गानेवाली हा दादरा, ठुमरी व गझल यावर आधारित संगीतमय कार्यक्रम अवंती पटेल व ऋतुजा लाड सादर करतील.

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी जलदिंडी प्रतिष्ठानच्या 75 वर्षांवरील ज्येष्ठ महिला सदस्य नृत्य नाटिका सादर करतील. नृत्यशारदा कथक मंदिराच्या स्नेहल सोमण व विद्यार्थिनी नृत्यांजली प्रस्तुत करतील. त्यानंतर आकार प्रस्तुत अभिवादन भारतीय स्वातंत्र्याला हा समूह गीतांचा कार्यक्रम होईल. स्वरसागर महोत्सवाची (Nigdi) सांगता विदुषी मंजुषा पाटील यांच्या शास्त्रीय गायनाने होईल.
याशिवाय स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 7 ते 15 ऑगस्ट दरम्यान शास्त्रीय गायन, वादन व नृत्याच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांसाठी 15 वर्षांखालील व 15 वर्षांवरील असे दोन वयोगट आहेत. सर्वप्रथम नोंद करणाऱ्या 20 स्पर्धकांनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यासाठी 7743833644 व 9923409116 या क्रमांकावर तसेच swarsagar2019@ gmail.com या इमेलवर संपर्क करावा.

MPC News Impact : आळंदीतील खड्ड्याची पूजा पावली; अखेर प्रशासनाने घेतली तात्काळ दखल

पिंपरी चिंचवडमधील संगीत रसिकांच्या मर्मबंधातील ठेव असलेला स्वरसागर महोत्सव यंदा 25 व्या वर्षात पदार्पण करणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराची शान असलेल्या स्वरसागर महोत्सवाचे कोविड काळात देखील यशस्वी आयोजन करून ही आपली सांस्कृतिक परंपरा जपली होती. येथे अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. यंदा देखील अनेक नामवंत कलाकार येथे येऊन आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत.

त्यामुळे स्वरसागर महोत्सवाला येऊन कलाकारांना भरभरुन दाद द्या असे आवाहन यानिमित्ताने महोत्सवाचे सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी व शरयूनगर मित्रमंडळ, प्राधिकरण यांचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे. सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.