Ajit Pawar : संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्हा सहकारी बँकेत 32 वर्षापासून काम करत होते. या दरम्यान आशिया खंडातील एक नंबर बँक म्हणून नावारूपास आली.पण उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा कारभार वाढला आहे.
त्यामुळे पक्ष संघटनेसाठी वेळ आणि उपमुख्यमंत्रीपदाला न्याय देण्यासाठी अजित पवारांनी सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला.मात्र अजित पवार दर महिन्याला बँकेचा आढावा घेणार असल्याच स्पष्टीकरण पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी (Ajit Pawar) दिले होते.