Pimple Gurav : किरकोळ कारणावरून महिलेला आई व मुलाकडून मारहाण

एमपीसी न्यूज – पाण्याच्या टाकीत बाटल धुवून टाकत (Pimple Gurav)असल्याबद्दल हाटकले म्हणून महिलेला आई व मुलाने शिवीगाळ करत मारहाण केली आहे. हि घटना गुरुवारी (दि.30) पिंपळे गुरव येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून तेजस लेंभे व महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune : ट्रक चालकाला मारहाण करून ट्रकसह तब्बल 37 लाख रुपयांचा ऐवज चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी(Pimple Gurav) व सोसायटीच्या इतर महिला पाणी भरण्यासाठी सोसायटीच्या टाकीजवळ आल्या होत्या. यावेळी आरोपी महिला देखील त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल घेवून आल्या होत्या यावेळी आरोपी महिला ही पाण्याच्या बॉटल धूवून पाण्याच्या टाकीत टाकत होती.

यावेळी फिर्यादी यांनी हाटकले असता आरोपी महिलेने व तिच्या मुलाने फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.