Khed : गोशाळेतून तीन जनावरे चोरीला
एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील बिरदवाडी येथील (Khed)एका ट्रस्टच्या गोशाळेतून तीन जनावरे चोरीला गेली आहेत.ही घटना 8 नोव्हेंबर रोजी रात्री माऊली गोशाळा ट्रस्ट येथे घडली.
याप्रकऱणी गणेश ज्ञानदेव हुलावळे (वय 32 रा.चाकण)(Khed) यांनी बुधवारी (दि.13) फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गोशाळा चालक असून त्यांच्या गोशाळेतून चोरट्यांनी दोन म्हशी व एक गाय अशी 50 हजार रुपयांची तीन जनावरे चोरून नेली. हा प्रकार उघडकीस येताच हुलावळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=SMr_YX0RQAg&ab_channel=MPCNews