Ravet : रावेत मधून अडीच लाखांचे एमडी ड्रग्स जप्त
एमपीसी न्यूज – रावेत मधून अडीच लाखांचे (Ravet) एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि. 23) रात्री केली.
रोहित सुरत सिंह (वय 27, रा. आकुर्डी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत परिसरातून अमली पदार्थ (Ravet) विरोधी पथकाने एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख 40 हजार रुपये किमतीचे 24 ग्रॅम एमडी ड्रग्स, तसेच 60 हजार रुपये किमतीची दुचाकी आणि 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण तीन लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी रोहित याने हे अमली पदार्थ विक्रीसाठी आणले असल्याचे तपासात समोर आले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.