Wakad : विनाकारण तरुणाला दोघांकडून मारहाण
एमपीसी न्यूज – विनाकारण तरुणाला दोघांनी काचेच्या ग्लासने मारहाण केली आहे, ही घटना गुरुवारी (दि.4) वाकड येथे घडली आहे,
राम ओमप्रकाश लोंढे (वय 21 रा. बाणेर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे. यावरून वाकड पोलिसांनी सिद्धांत जाधव (वय 35) व बाळू शिंदे दोघे रा. वाकड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Pune : माहेरच्यांकडे जास्त लक्ष देते म्हणून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खूनाचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बर्ड व्हॅली (Wakad) येथे जेवणासाठी गेले होते. तेथे आगोदर पासूनच बसलेले असताना आरोपींनी विनाकारण फिर्यादीला शिवीगाळ करत काचेचा ग्लासने मारहाण केली यावरून वाकड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील तपासणी ( Wakad) पोलिस करीत आहेत.