Loksabha election 2024 : मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द

एमपीसी :  शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने (Loksabha election 2024)  संधी दिली होती. पण त्यांनी पक्षाच्या निर्णयाला विरोध केल्याने  त्यांच्यावर कारवाई करून त्यांची उमेदवारी आज (दि.7 एप्रिल) रोजी रद्द करण्यात आली. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार  (Loksabha election 2024) न देण्याचे धोरण ठरवले होते.बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.

https://x.com/VBAforIndia/status/1776568793352872103

Talegaon Dabhade : साप्ताहिक ‘अंबर’ तर्फे पाच जीवनगौरव पुरस्कारांसह 18 जणांचा होणार सन्मान

शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार गट)  आणि शिवाजीराव आढळराव पाटील  राष्ट्रवादी कॉंग्रेस ( अजित पवार गट) यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.