Delhi : महावीर जयंतीनिमित्त दिल्लीत निर्वाण महोत्सव

एमपीसी न्यूज – भगवान महावीर जयंतीनिमित्त 2550 व्या निर्वाण महोत्सवाचे ( Delhi ) उद्या (रविवारी) दिल्लीत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी  उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra :  तापमानवाढीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत

चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. उद्या रविवारी महावीर जयंती आहे. त्यानिमित्त  केंद्र सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालयाच्या  भगवान महावीर मेमोरियल समिती आणि भगवान महावीर निर्वाण महोत्सव समितीच्या वतीने  2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे आयोजन केले आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर हा महोत्सव होणार आहे.

पुरुषांसाठी पांढरा तर महिलांनी केसरी रंगाचे कपडे परिधान करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. श्वेतपिच्छाचार्य श्री विद्यानन्द  मुनिराज, आचार्य सम्राट डॉ. शिवमुनी जी म. सा, आचार्य जिनपीयूषसागर सूरीश्वर, आचार्य  महाश्रमणजी म.सा. यांचे मार्गदर्शन होणार ( Delhi ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.