Hinjawadi News : विनाकारण घराबाहेर फिरणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोणतेही कारण नसताना घराबाहेर फिरत असलेल्या एका तरुणावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

निखिल सुरेश कडू (वय 27, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल बुरटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असताना आरोपी निखील कडू गुरुवारी (दि. 20) रात्री साडे सात वाजताच्या सुमारास चांदणी चौक, बावधन येथे दुचाकीवरून (एम एच 12 / के व्ही 7408) विनाकारण फिरत असताना पोलिसांना आढळला.

त्यामुळे त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 269 व साथीचा रोग कायदा कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम कलम 51 (ब), महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना कायदा कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.