एमपीसी न्यूज : बुधवार (दि 21) उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार व तालुका कृषी अधिकारी मावळ देवेंद्र ढगे यांचा क्षेत्रीय पाहणी दौरा वडगाव मंडळ कार्यक्षेत्रामध्ये पार पडला.
यावेळी मौजे वहाणगाव येथील कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत उभारलेल्या मुरघास युनिट, तसेच मौजे माळेगाव बुद्रुक येथील चारसूत्री भात लागवड व माळेगाव खुर्द येथील नाचणी पीक प्रात्यक्षिक व कोईमतूर 51 या वाणाच्या भात पीक प्रत्यक्षिकाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दौऱ्याचे यशस्वी आयोजन विक्रम कुलकर्णी मंडळ कृषी अधिकारी वडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक नागेश शिंदे, नितीन बांगर, अरफान पिरजादे व श्रद्धा कुलकर्णी यांनी केले.