Pune – वारजे नाक्याजवळील स्टेशनरी दुकानाला आग

एमपीसी न्यूज – वारजे नाका येथील स्टेशनरी दुकानाला आग लागली. ही घटना आज सोमवारी (दि.15) पहाटे 2च्या सुमारास वारजे येथील जिजाई गार्डन समोरील जिगर प्लॅस्टिक शॉपमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट जिगर प्लॅस्टिक शॉपमध्ये अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तेथे पोहचल्या व 20ते30 मिनिटांत आग विझवण्यात आली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाहि परंतु दुकानातील वस्तुचे मात्र नुकसान झाले आहे. लागलेल्या आगीत स्टेशनरी व इतर सामान जळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.