Car Fire : मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग; जखमी वा जिवितहानी नाही

एमपीसी न्यूज – काल मध्यरात्री दिनांक 12 ऑक्टोबर रोजी 12.47 वाजता आहिरे गाव कमान, वारजे येथे एक चारचाकी वाहन पेटल्याची वर्दी अग्निशमन नियंत्रण कक्षात मिळाली असता तातडीने वारजे अग्निशमन केंद्राचे (Fire Brigade Center) वाहन रवाना करण्यात आले होते.

River Pollution : पवना आणि इंद्रायणी नद्या प्रदूषण मुक्तीसंदर्भात सामाजिक संस्था, नागरिक आणि प्रशासनामध्ये चर्चा

घटनास्थळी जवान पोहोचताच मारुती कंपनीचे आल्टो चारचाकी वाहन (सीएनजी) पुर्ण पेटल्याचे निदर्शनास आले असता जवानांनी आतमधे कोणी अडकले नसल्याची प्रथम खाञी करुन पाण्याचा मारा करत सुमारे दहा मिनिटात आग विझवली. आगीचे नेमके कारण समजले नाही. सदर घटनेत कोणी जखमी वा जिवितहानी नाही.

या कामगिरीत वारजे अग्निशमन केंद्र
तांडेल राजेंद्र पायगुडे, वाहनचालक ढावरे तसेच फायरमन जयेश लबडे, निलेश तागुंदे, ऋषिकेश हांडे, गोविंद केंद्रे, उमेश ताठे यांनी सहभाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.